भेकड
published in Antarnad --when ????? भेकड तो जंगलात रहात होता. जंगलाचे नियमच वेगळे असतात. कुणी कुणावर दबाव टाकत नाही कि जोर जबर्दस्ती नाही. कुठेही कितीही वेळ भटका, वाटेल तेंहा घरी परता. जंगल इतकं मोठ असत, तरी पण इथे रस्त्यांची ओळख करून घेणं सोप असत. आणि कधी मुख्य रस्त्यावरून भटकत दूर गेलो तरी पर्वा नाही. घरी लौकर परतायची घाई नाही आणि घरापासून दूर रहाण्यांत फार धोकेही नाहीत । निदान त्याच्यासाठी तरी नाहीच. तो शक्तिमान होता. पण शहराचे नियम वेगळे होते. त्याने ऐकल होतं की शहरी लोकांनी शहरांना खूप गजबजून टाकल होतं आणि कठिण करून टाकलं होतं. एक रस्ता चुकून दुस-या रस्त्यावर गेलात तर कळणारच नाही की आता परत कस जायच. जंगलाने त्याला खूप कांही शिकवल होतं. त्यातली अगदी प्रारंभिक शिकवण होती की आलेला रस्ता ओळखून त्यावरूनच कस परत जायच. पण ज्यांनी शहरांचे थोडे फार नियम पाहिलेत ते सांगत असतात की शहरी लोकांचे रस्ते इतके गुंतागुंतीचे आहेत की जंगलातली कोणतीही शिकवण इथे उपयोगाची नाही. त्यापेक्षा शहाणपणाची गोष्ट म्हणजे जो जंगलात स्थिर-स्थावर झाला आहे त्याने शहराकड़े ढुंकूनही पाहू नये. याच जंगलात त्...