सरकार, पालक आणि आत्महत्या
सरकार, पालक आणि आत्महत्या लीना मेहेंदळे दि. 27.5.2010 लोकसत्ता दि. 23 जूनच्या अंकांत प्रसिद्ध http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=79886:2010-06-22-15-02-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 बारावीच्या परीक्षेचा निकाल लागण्याच्या पुढच्या दिवशीच नापास झालेल्या तीन मुलीमुलांच्या आत्महत्येची बातमी आली ती वाचून सुन्न व्हायला झाले. जानेवारीपासूनच ज्या पद्धतीने रोज रोज विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या येत आहेत तो ट्रेंड पाहता भविष्यकाळांत काय वाढून ठेवले आहे याची काळजी वाटते. यावर सर्वप्रथम व तातडीने काही करता येत असेल तर तो उपाय म्हणजे परीक्षेचा तणाव थांबवणे. परीक्षा बोर्डांनी तात्काळ जाहीर करण्याची गरज आहे की त्यांच्या परीक्षा दर महिन्याला होतील व ज्या मुलांना मार्चसाठी आपला अभ्यास पूर्ण झाला नाही असे वाटते त्यांच्यासाठी पुढे दर महिन्याला ती व्यवस्था असेल. म्हणून सर्वांत आधी मार्च परीक्षेचा तणाव मनावरून काढा. जी व्यवस्था बोर्डाच्या परीक्षेची तीच शाऴेतील इतर वर्गांच्या परीक्षेची ठेवता य़ेईल – थोडक्यांत कांय तर वार्षिक परीक्ष...