Posts

Showing posts from February, 2010

संगणकाची जादुई दुनिया -- my new book is published

Image
Available with Govt printing press. phone no. 022-23631357 Released on 2nd feb at the hands of CM भूमिका संगणकासंबंधी पुस्तक लिहाव अस मला का वाटल ? तस पाहिल तर या विषयावर पुष्कळ पुस्तक लिहिली गेली आहेत - इंग्रजी सोबत मराठीतूनही लिहिली गेली आणि आता तर शाळा कॉलेजेस मधून संगण्रक शिक्षण सुरु झाल्याने अभ्यासक्रमातील पुस्तकेही उपलब्ध आहेत. लहानमोठया व्यापारी व स्वयंसेवी संस्थांमध्ये आणि मध्यमवर्गीयांच्या घरांतही वैयक्तिक वापरासाठी मोठया संख्येने संगणक रुजू झाले आहेत. त्यांच्याकडील तरुण पिढीला संगणक चांगल्यापैकी वापरता येतो. हे पुस्तक लिहितांना माझ्यासमोर कोण व्यक्ती आहेत? कोणासाठी हे पुस्तक आहे? सर्व प्रथम माझ्यासमोर आहे तो शासकीय कार्यालयांतील स्टाफ. सुमारे 20 लक्ष कर्मचा-यांना संगणकातील कांय कांय व किती किती येत याची सरासरी काढली तर त्यांना जेवढे यायला हवे त्यापैकी फक्त वीस टक्के येते असे माझे ढोबळ निरीक्षण आहे. तेही गेल्या दहा वर्षांत रुजू झालेल्या व तुलनेने तरुण असलेल्या स्टाफमुळे. खरं तर शासनांत संगणक वापरण्यासाठी वैज्ञानिकांना असते तितकी प्रवीणता नकोच आहे. संगणक प्रोग्रॅमिंगमध्ये तज्ज्...