Posts

Showing posts from December, 2009

यक्ष प्रश्न

यक्ष प्रश्न -- लीना मेहंदळे ( सकाळ साठी शब्दांकन -- राधिका कुंटे) लहानपणी आपण जे वाचतो, ऐकतो नि पाहतो ते आपल्या स्मृतीमध्ये स्कॅन केल्यासारखं राहतं. त्यातील एखाद्या भावलेल्या गोष्टीसंबंधी विचार आपल्या नकळत चालू राहतात. माझे वडील संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांच्या पुस्तकाच्या संग्रहातून मी महाभारत काढून वाचलं होतं. `यक्षप्रश्ना`चा भाग खास करून त्यातील दोन प्रश्नांची उत्तरं माझ्या मनात ठाण मांडून बसली होती. याच विषयावरील एक पुस्तक हाती लागलं ते म्हणजे- आचार्य निशांतकेतूलिखित `सनातन यक्षप्रश्न` हे हिंदीतील पुस्तक. या पुस्तकात महाभारतातल्या गोष्टीचा संदर्भ आहे. द्यूतात राज्य हरून पांडव वनवासी होतात. एक दिवस त्यांच्याकडे एक ऋषि येतात. `यज्ञाच्या तयारीत एक हरीण वारंवार येऊन अडथळा आणतंय. त्या हरीणाचा बंदोबस्त करा,` अशी विनंती ऋषिवर्य करतात. हरीणाचा पाठलाग करता करता या पाच भावंडांना तहान लागते. पाण्याच्या शोधार्थ सहदेवास पाठवलं जातं. तो येत नाही, म्हणून पाठोपाठ नकुल, अर्जुन, भीमास पाठवलं जातं. अखेरीस युधिष्ठिरच त्यांचा शोध घेत घेत एका तळ्यापाशी पाणी प्यायला जातो. तिथं हे चारहीजण मृतप्राय अव...

स्त्री उवाच – सहभागिता हवी

स्त्री उवाच – सहभागिता हवी लीना मेहेंदळे दि. १४-१२-०९ (थोड्या फरकाने महाराष्ट्र टाइम्स -- 13 Mar 2010 -- समान सहभाग अजून खूप दूर! थोड्या फरकाने लोकमत दि. 13 मार्च 2010 -- ..........) स्त्री म्हणाली परम्परेला - मला थोडासा इतिहास सांगतेस - कसं घडवलस तू स्त्रीला गेल्या कित्येक सहस्त्रकांत? आणि कां? आणि पुढे कांय प्लान आहेत तुझे? कांय वाढून ठेवल आहेस तू माझ्यासाठी? किती दिवस स्त्रीने फक्त घरांतील पाळण्याची दोरी धरायची आणि फक्त आपल्या घरापुरती भावी पिढी घडवायची? त्या पलीकडे जाऊन समाज आणि देशाचा पाळणा हलवण्याची, सबंध देशाचे भविष्य ठरवण्याची आणि घडवण्याची संधी स्त्रीला कधी मिळणार? परम्परा म्हणाली, अशी घायाळ नजरेने नको पाहूस माझ्याकडे. तुला एक गुपित सांगते. परम्परा स्त्रीला घडवते हे तितकस खरं नाही. मला तर खूपदा वाटत की स्त्रीच परम्परेला घडवते. कदाचित अस असेल की आपण दोघीनी ठरवल - एकमेकांना समजून घ्यायच आणि एकत्रपणे प्लान करायच तर खूप चांगल कांही होऊ शकेल. भूतकाळातून धडा तर घेऊ ...