Posts

Showing posts from June, 2009

विपश्यना – मला समजलेली

विपश्यना – मला समजलेली --- लीना मेहेंदळे बघता बघता तिस-या सहस्रकाचे आणि एकविसाव्या शतकाचे पहिले दशकही संपत आले. या काळात वेगाने आलेले जागतिकीकरण, आर्थिक तेजी आणि आता आर्थिक मंदी आपण पाहिली. जगातील बहुतेक व्यवहार याच वाटेने पुढे जात राहणार आहेत. यामधे जीवनावरील आपली पकड हरवत आहे का असा प्रश्न पडतो. नुकताच माझ्या मोठ्या मुलाबरोबर मोटिव्हेशन च्या मुद्दावर संवाद चालू होता. अशा वेळी तो पटकन्‌ विद्यार्थ्याच्या भूमिकेत येतो - गंभीरपणे चर्चा ऐकतो आणि फारच मूलभूत प्रश्न विचारतो. मी विचारले - माणसाने स्वत:चे मोटिव्हेशन कसे करावे, इतरांचे कसे करावे, कसे टिकवावे याबद्दल खूप वाचायला मिळते. पण माणूस दुस-याला मोटिव्हेट का करतो किंवा का करू पाहतो याचा उहापोह कोणी करत नाही. मी केला आहे, पण मला बघायचं आहे की तू कांही कारणे सांगू शकशील कां ? यावर मिनिटभर विचार करून तो म्हणाला - नाही सांगू शकणार, कारण या प्रश्नाच्या उत्तराच्या आधी माणूस का जगतो या प्रश्नाचे उत्तर शोधले पाहिजे असे मला वाटते. मी म्हटले - ठीक आहे, त्याचे उत्तर सांग - तो म्हणाला - तेही मला नीट सांगता येणार नाही. पण ढोबळ मानाने असे म्हण...

चरखा-टकळीचे तत्वज्ञान

चरखा-टकळीचे तत्वज्ञान (हे ही पहावे चरख्याचे तत्वज्ञान प्रत्यक्षांत आणता येईल कांय -- लोकसत्ता बुधवार 8 जुलै 2009 पुन्हा चरखा http://sites.google.com/site/leenameh/punha-charkha.pdf) काही दिवसापूर्वीची गोष्ट, एका विशिष्ट ध्यासामुळे मी ठरवलं की, आपण चरख्यावर सूत कातायला शिकायचं. ती सुरूवात झाली आणि एक वेगळचं तत्वज्ञान मनाला जाणवू लागलं. आता लक्षात आलं की, शेले विणताना कबीराला दोहे सुचत आणि जात्यावर बसून बहिणाबाईना ओव्या सुचत ते कसे. तसं पाहिल तर, चरखा हे दिसायला किती सोपं काम, चरख्याला एक टकळी असते आणि एक फिरवायची तबकडी. तबकडी गोल फिरवली की, टकळीवर दोरा फिरतो. त्याने दो-याला पीळ पडतो व त्याला मजबुती येते. दो-याच्या टोकाला पेळूचा कापूस गुंतवला आणी थोडासा ताण देऊन ओढल की, सूत निघत रहातं, तबकडी फिरवून या सुतावर हल्कासा पीळ देऊन पक्का करायचा आणि टकळीवर गुंडाळून घ्यायचा की पुन्हा पेळूतून नवीन धागा ओढायला आपण तयार. पण प्रत्यक्ष चरखा चालवायला बसल्यावर जाणवलं की हे काम दिसत तितकं सोप नाही. कापसातून जो धागा कातला जातो त्याच्या टोकाला भरपूर तंतू असतात. पेळूवर त्यांना ठेऊन टकळीने अग...