आईच्या आठवणी--- बीज चांगुलपणाचे
बीज चांगुलपणाचे 1949 सालची घटना. माझ नुकतंच लग्न झाल होतं. मी त्या दिवशी लोणावळ्याला जाणार होते. तो पर्यंत मी रेल्वेत बसलेली नव्हतेच. माझं माहेर रत्नागिरी जिल्हयातील देवरुख या गावचे. तिथेच मी मॅट्रिक झाले व गांवदेवी मुंबई येथे होस्टेलला आले. इथे एका वर्षातच प्राथमिक शिक्षणाचे ट्रेनिंग पुरे होत असे. ते करतांनाच लग्न ठरले व झाले सुद्धा. लग्नानंतर थोड्याच दिवसांनी परीक्षा होती तोपर्यंत होस्टेललाच राहिले. परीक्षा झाली व हयांनी लोणावळ्याची तिकीटे काढली. आम्ही स्टेशनवर आलो. तो काय गाडी स्टेशनमध्ये थांबलेली व पिवळा सिग्नल पण झालेला. हे भर्रकन गार्डच्या डब्यात गेले व त्याला म्हणाले माझी बायको व हमाल जिना उतरत आहेत तोपर्यंत थांबता का? ती आतापर्यंत कधीच गाडीत बसलेली नाही. पहिल्यांदा झेंडा दाखवा तर ड्रायव्हर थांबेल. नाही तर मी उतरतो खाली. आमचे नशीब बलवत्तर म्हणून गार्डने लाल निशाण दाखविले. गाडी थांबून राहिली. मी पटकन जिना उतरले व हमाल पण. हयांनी हमाली काढूनच ठेवली होती. आम्ही गाडीत बसलो व गाडी सुरु झाली. आज इतकी वर्षे झाली तरी सुध्दा त्या गार्डचे मी आभार मानते. पूर्वी चांगली माणसे ख...