असे होते माझे पीए
असे होते माझे पीए -- श्रीमती लीना मेहेंदळे, भाप्रसे सहसचिव तथा कार्यकारी संचालक पी.सी.आर.ए., नवी दिल्ली गेल्या तीस वर्षांच्या शासकीय सेवेत माझी जी काही प्रशासकीय कुशलता दिसली असेल त्यातले बरेचसे श्रेय माझ्या पर्सनल असिस्टंटना जाते. नोकरीत आल्यानंतर सर्वप्रथम असिस्टंट कलेक्टर, हवेली या पदावर असताना वेगळे पीए कुणी नव्हते. पण नुकत्याच क्लार्क लागलेल्या दुधाणे या माझ्या अलिखित पीए होत्या. खिरे, पवार, गोरे, जोशी आणि दुधाणे असे पाचजण मिळून पूर्ण ऑफिसचे काम बघत. पूर्णवेळ माझेच असिस्टंट म्हणून काम बघणारे पहिले पीए म्हणजे औरंगाबाद जिल्हा परिषदेचे बल्लाळ त्यानंतर सांगली जिल्हा परिषदेचे देशपांडे, सांगली कलेक्टर कार्यालयाचे खोत, WMDC मधे आधी शेख व नंतर सौ. जोग, यशदामध्ये सौ. नाईक आणि थोरात, NIN मध्ये उत्तम व विनय, नाशिक कमिशनर कार्यालयात वाणी, सेटलमेंट कमिशनर असताना जमादार व माने, MSFC मध्ये लीलम्मा व भुरके, NCW मध्ये शामकिशोर व मधु तर PCRA मध्ये चावला व चमोली या सर्वांनी वेळोवेळी माझी सर्व कामे सांभाळली. त्यातून बर्याच मुद्यांवर एक सिस्टम बसवून घेणे मला शक्य झाले. यातल्या काही ठळक बाबी अशा- नि...