Posts

Showing posts from November, 2015

अँडव्हाण्टेज गोवा --- हा टिकणार का?

अँडव्हाण्टेज गोवा-- हा टिकणार का? गेली वर्ष दीड वर्ष नोकरीनिमित्त गोव्याला वास्तव्य करण्याचा योग आला. त्यामुळे इथले समाजजीवन जवळून पाहता आले आणि त्यातूनच गोव्यातील समाजमनाचे वेगळेपण जाणवले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे किंवा कर्णाटकातील बंगळूर या मेगा व मेट्रो शहरांच्या तुलनेत गोव्यातील प्रत्येक शहर हे लहानच म्हणावे लागेल. त्यामुळे त्यांच्या सारखे "फास्ट" जीवन नसून इथल्या जीवनाला एका शांत प्रवाहासारखा संथपणा आहे. गोंय समाजाची सांगता येण्यासारखी वैशिष्ठ्ये आहेत, व ती गोंयकरांना इतर प्रातीयांच्या तुलनेत श्रेष्ठ ठरवतात असे म्हणायला हरकत नाही. यालाच मी अँडव्हाण्टेज गोवा म्हणते. त्यातील सर्वात मोठा अँडव्हाण्टेज म्हणजे साक्षरता आणि शिक्षण. गोव्यातील साक्षरता ९५ टक्क्याच्या आसपास आहे आणि शाळकरी वयातील कोणतीही मुलगी किंवा मुलगा घरी बसत नाही. त्यामुळे शिक्षणाची किमाण पातळी ही आठवी पर्यंतची आहे. महाराष्ट्रात १०० ते ११० टक्के पहिलीचे एनरोलमेंट असूनही गळतीला  दुसरी तिसरीपासूनच झपाट्याने सुरूवात होते. गोव्यातील शालेय गळती ही त्या तुलनेने अगदी नगण्य आहे.