Posts

Showing posts from April, 2014

भारतीय संस्कृति म्हणजे नेमके काय ?

Image
भारतीय संस्कृति म्हणजे नेमके काय ?  तिची (आतापर्य़ंत टिकलेली) चिरंतनता संपत आहे का ? आणि किती लौकर नष्ट होणार ?  तसे होणे म्हणजेच हवीहवीशी आधुनिकता आहे काय?  भारताचा विकास म्हणजे नेमके काय ? आज होतांना दिसत असलेला विकास आपल्याला भारतीय संस्कृतिपासून दूर नेत आहे का? असल्यास आपण विकास आणि भारतीय संस्कृति या दोहोंपैकी काय उचलणार ? Ashok Gaikwad … विकासाची व्याख्या नव्याने समजावण्याची वेळ आली आहे. आधुनिक पद्धतीने शेती … म्हणजे विकास ( का ऱ्हास ?)…का जुनी पद्धत (सेंद्रिय) / रासायनिक खतांशिवाय शेतीच बरोबर. जंगले तोडून (तेथल्या वनवासिंना संपवून) शहरे वसविने म्हणजे विकास (?)…  आजकाल त्याला 'Land Development' म्हणतात. पश्चिम घाटातील समृद्ध वनराई (flora-fauna) संपवून तेथे औद्योकीकरण करणे म्हणजे विकास याचा विचार व्हायलाच हवा. दुर्दैवाने कुठलाच राजकीय पक्ष / नेता यावर भाष्य करीत नाही. संस्कृती म्हणजे जीवन-शैली. परंपरांचे पालन म्हणजे संस्कृती नव्हे (कदाचित मी चूक असेल). अगदी डोळसपणे … परिणामांचा (संपूर्णपणे सर्वसमावेशकपणे निसर्गावरचा,