Posts

Showing posts from March, 2010

मुखी विठ्ठलाचे नाम आणि हाती सुताचा धागा

मुखी विठ्ठलाचे नाम आणि हाती सुताचा धागा -- मोतीचंद बेदमुथा। उस्मानाबाद ज्ञानेश्वर माऊलींनी एक तरी ओवी अनुभवण्याचा दिलेला संदेश आणि महात्मा गांधीजींच्या स्वदेशीच्या नाऱ्यातून निघालेला सुतकताईचा कर्मयोग यांचा अनोखा मिलाफ यंदा वारकऱ्यांच्या दिंडीतून साधला जात आहे. मुखाने विठ्ठलाचे नाव घेता घेता हातातल्या टकळीवर सुताचा धागा तयार करणार आहेत. या सुतातून तयार झालेले वस्त्र यंदाच्या आषाढी एकादशीला पांडुरंगाला अर्पण करण्यात येणार आहे. मुखाने विठ्ठलाचे नाव घेत लाखो वारकरी पायी पंढरपूरला जातात. हरिनामाचा उच्चार करीत चालताना हातातल्या टकळीवर कापसापासून धागा तयार केला तर त्यापासून चांगले उत्पन्न मिळू शकेल अशी कल्पना राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रधान सचिव लीना मेहेंदळे यांना सुचली. या संकल्पनेस अखिल भारतीय वारकरी मंडळाचे प्रकाश बोधले यांनी साथ दिली. वारकऱ्यांना सुतकताईचे प्रशिक्षण देण्यासंदर्भात मराठवाड्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेण्यात आल्या. छोट्या चरख्याप्रमाणे हातातील टकळीवर धागा तयार कसा करायचा आणि त्यापासून वस्त्र कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिंडीत सहभागी होणाऱ्या ५० मह