Posts

Showing posts from October, 2007

xxxx Our beloved DADA -- my father -- Dr. B S Agnihotri

Image
माझे वडील डॉ. बलराम सदाशिव अग्निहोत्री यांचा जन्म सन् 1916 साली कार्तिक शुद्ध प्रतिपदेला धरणगांव जिल्हा जळगांव येथे झाला. पुढे वाचा http://www.geocities.com/bsagnihotri/index.html या साईट वर

मी परत जाईन

Also on the site nity_leela मी परत जाईन मूळ हिन्दी -- उदय प्रकाश अनुवाद -- लीना मेहेंदळे कार्तिकात जसे ढग परत जातात, ऊन जसे परतून जाते आषाढांत, दंव जसे गुपचुप परत जाते आभाळात अंधार परत जातो कोण्या अज्ञातवासात आपल दुखतं शरीर घोंगडीत लपेटून, थोडकस सुख आणि चिमूटभर सांत्वनासाठी सगळयांच्या नजरा चुकवून येणारी व्याभिचारिणी जशी परत जाते भयभीत आपल्या गुहेत, वृक्ष परतून जातात जसे बीजांत, आपली भांडी, पातेली, अवजारं, उपकरणं आणि घंगाळं घेऊन जशा परत जातात सर्व विकसित झालेल्या संस्कृत्या दरवेळी, पृथ्वीच्या पोटात, इतिहास जसा विलीन होऊन जातो कुण्या जमातीच्या लोकगाथांमधे विज्ञान जसे परतून जाऊन बसते देवऋषी आणि मांत्रिकाच्या जादू-टोण्या मधे, तमाम औषध माणसाच्या असंख्य रोगांना घाबरून जशी विलीन होतात कुण्या बाबाच्या स्पर्शात किंवा मंत्रात, मी परत जाईन, जशी समस्त महाकाव्य, संपूर्ण संगीत, सगळ्या भाषा आणि सा-या कविता परतून जातात एके दिवशी ब्रम्हांण्डात, मृत्यू जसा परत जातो आयुष्याचं गाठोडं डोक्यावर लादून, उदासवाणं, आणि रक्त जस परत जात कोणास ठाऊन कुठे, आपलया मागे शिरांमधे ठेऊन निर्जीव, निस्पंद जल, जसा एखादा नि

एक शहर मेले त्याची गोष्ट

एक शहर मेले त्याची गोष्ट सोळाव्या शतकाने डोळे उघडून आळोखे-पिळोखे दिले आणी पृथ्वीकडे नजर टाकली. एक मोठा - डोंगरपट्टा दिसला. त्यावर घनदाट अरण्य. त्यातच एक मोठा झुपका हिरडयांच्या झाडांचा - शेजारी एक छोटी वस्ती. सोळाव्या शतकाने त्या वस्तीकडे रोखून पहात म्हटले - इथे कांही तरी वेगळ घडेल. वस्तीच्या पूर्वकडे घनदाट जंगल होत बहुतांशी हिरडयाची झाड, पण इतरही चिकार जाति होत्या मोठे वृक्ष - तीन चारशे वर्ष आयुष्य असणारे - छोटी झुडप, लता, वेली, गवतांचे किती तरी प्रकार. प्रत्येकाचे आयुर्मान निराळे. प्रत्येकाचे ज्ञान तंतु निराळे, स्वभाव निराळा. वस्तीच्या पश्च्िामेला शेती होती. तिथे बहुतांशी बाजरी पिकायची. कधी कधी थोडी तूर, थोडे चणे, थोडे तीळ उगवले जात. शेताच्या बांधावर कुठे लिंब, कुठे बाभळी ! कुणी आंबा लावला असेल, कुणी चिंच, तर कुणी चक्क सागवान पण बांधावरच्या झाडांवर सगळया गांवाचा वाटा असायचा. कुणाला चटणीसाठी चिंच हवी असेल तर काळूच्या बांधावरुन घेऊन यायची कुणाला दात घासायला बाभळीची काडी हवी असेल तर पुढे नामदेवाच्या शेतात जायच. भाजीपाला आणी फुलं पण शेतात पिकवत नसत. प्रत्येकाच्या परसात कांही ना कांही ल

URL in sanskrit

Now URLs Can Be Typed in Arabic And Ten Other Languages 5 hours ago by Adilski Starting Monday URL addresses can be typed fully in Arabic and ten other non-latin languages such as Cyrillic and Sanskrit, Al-Arabiya TV said. The extensions .com, .org, and .info had to be written in a latin-based language before, ... A Moro in America - http://adilski.blogspot.com/

अईने लिहिल्या आठवणी

अईने लिहिल्या आठवणी दादा गेल्यावर आई अगदीच हरवून गेली होती.त्यांत पुणे सोडून भुवनेश्वरला सतीशकडे जावे लागले. नशीब की सतीशकडे आधी पण राहिली असल्याने तिथले वातावरण, घरातले नोकर चाकर ओळखीचे होते.मग मी तिला सुचवले की तू तुझ्या आठवणी लिहून काढ. तसे केल्यावर तिला समाधान मिळून एक प्रकारची उभारी आली आहे.छानच लिहिले तिने.आता मधे थोडा काळ गेला की मी पुन्हा लकडा लावणार की अजून लिही. तिच्याकडे खूप आहे लिहिण्यासारखे. ते लोड करून ठेवले आहे http://www.geocities.com/janta_ki_ray/AAI/index.html वर.