Posts

Showing posts from September, 2007

02 सत्ता आणि सुव्यवस्था

सत्ता आणि सुव्यवस्था Article 2 in इथे विचारांना वाव आहे. -- लीना मेहेंदळे -- महाराष्ट्र टाइम्स सुव्यवस्था ही सर्व सजीव प्राणी मात्रांची पहिली आणि मूलभूत गरज आहे. झाडे अचल असूनही ही सुव्यवस्था कशी राखतात हा फार दार्शनिक किंवा भौतिक शास्त्राचा प्रश्न असेल. मात्र इतर चल प्राणी, पशु, पक्षी, किडे, मुंग्या, माणसं यांची सुव्यवस्था कशी रहाते हा समाजशास्त्राचा विषय आहे. अपरिहार्य पणे असे दिसून येते की, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी दृश्यमान, स्पष्ट दिसून येणार्‍या व जाणवणार्‍या सत्तेची गरज असते. सगुण निर्गुणच्या वादाचे हेच मूळ असावे. कारण निर्गुण निराकार ब्रह्माला देखील किमान ॐ, अल्ला किंवा गॉड या शब्दांची गरज भसतेच. सगुण ईश्र्वरी सत्तेची स्थळे तर आपल्याला जागोजागी दिसतातच. इंग्लिश मध्ये जरी म्हण असली कि दॅट गव्हर्नमेंट इज दी बेस्ट व्हिच गव्हर्नस दी लीस्ट, तरी ते गव्हर्निंग अगदी शून्या पर्यत येऊ शकलेलं नाही. एकच अपवाद आहे तो म्हणजे जेव्हा करुणा, प्रेम, अहिंसा या तत्वांवर सत्ता आधारीत असेल तेंव्हा. म्हणूनच रामाचे रामराज्य आपल्याला आजही आदर्श आणि हवेहवेसे वाटते. म्हणूनच भगवान बुद्ध, महावीर किंव

प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा

प्रशासनात संगणक कसा आणि किती वापरावा सा. विवेक, दिवाळी अंक दिवाळी १९९७ (थोडा अपडेट करून इथे टाकला आहे) आज सबंध जगभर संगणक हा परवलीचा शब्द झाला आहे. मात्र अजूनही आपल्या शासकीय कार्यालयांमध्ये याचा म्हणावा तसा वापर व उपयोग होत नाही. कारण संगणकाबाबत शासकीय कार्यालयांमध्ये काही गैरसमज आहेत. त्याच प्रमाणे गेल्या दहा वर्षांत संगणकाच्या क्षेत्रात जी प्रगती झाली, जी नवीन मशीन्स समोर आली, आणि जो सोपेपणा निर्माण झाला, त्याची जाणीव शासकीय कार्यालयात फार कमी लोकांना आहे. शासकीय कामकाजात संगणक नेमका कसा वापरावा याचा व्यवस्थित अंदाज शासकीय कार्यालयांनी घेतलेला नाही. संगणक हा विज्ञानाच्या प्रगतीतील एक महत्वाचा टप्पा असल्याने त्याचा वापर मोठया वैज्ञानिक कामगिरीसाठी करतात, हे सर्वसाधारणपणे कोणालाही माहीत असते. त्यासाठीच मोठया मोठया संगणक कंपन्या संशोधन करीत असतात. तरीही शासकीय कार्यालयामध्ये संगणकाचे मार्फत काम करावयाचे असल्यास संगणकाबाबत वैज्ञानिकांना शिकाव्या लागतील अशा किमान ९० टक्के गोष्टी तरी शासकीय कार्यालयात न शिकून चालतात. शासकीय वापरासाठी संगणकावावत फार कमी गोष्टी शिकल्याने काम भागते. ही बाब क

2/01 शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केंद्र हवे खेडे

शिक्षणाची फेररचना हवीच, पण तिचे केंद्र हवे खेडे कोल्हापूर सकाळ (४१) २७.३.८५ (इथे विचारांना वाव आहे या माझ्या लेखांच्या संकलनांत) आपला भारत हा एक अतिशय विस्तृत असा देश आहे आणि त्यांत सर्व प्रकारची भौगेलिक स्थित्यतरे, व भाषात्मक स्थित्यंतरे बघालया मिळतात. एवढे सगळे असूनही हा एक अतिशय एकसंघ असा देश आहे. या देशाची संस्कृती हजारो वर्षापासून चालत आलेली व म्हणूनच सर्वत-हेच्या समाजाना, सर्व त-हेच्या विभागांना एकत्र बाधून ठेवणारी अशी आहे. अशा या संस्कृतीत शिक्षणाला काय महत्व दिले जाते, याचा ऐतिहासिक आढावा घ्यायचाच असेल तर आपल्याला येट भगवद्गीतेपर्यंत जाता येते आणि 'न हि ज्ञानेन सदृशम्‌ पवित्रमिह विद्यते' असा साक्षात्‌ भगवंताचाच पुरावा देता येतो. म्हणून शिक्षणाचा प्रसार, प्रचार हा या राष्ट्राच्या समृद्धीचा एक मापदंड मानला पाहिजे. नुकतेच पंतप्रधानांनी सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण पद्धती बदलण्याची व त्यामधे काही चांगले बदल करण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले आहे. या संदर्भात आपल्याला काय प्रकारचे बदल हवेत व ने कसे उपकारक ठरतील हे तपासून बघणे योग्यच होईल. सध्याचा शिक्षण पद्धतीतले जे दो